मासिक पाळी व्यवस्थापन – स्त्रियांचे आरोग्य व कोविड – १९ लसीकरण समज गैरसमज

दिनांक २८ मे २०२१ रोजी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन – स्त्रियांचे आरोग्य व कोविड लसीकरण समज गैरसमज या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रतिभा जायभाय ( गिते) – स्त्रीरोग तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना
– मासिक पाळी म्हणजे काय ?
– मासिक पाळी चक्र.
– मासिक पाळी काळात स्वच्छता   कशी राखावी ?
–  मासिक पाळीच्या  काळात वापरायची साधने
– मासिक पाळी  व्यवस्थापनासाठी शासनस्तरावरून करण्यात येणारे विविध प्रयत्न
– स्त्रियांनी घ्यावयाचा योग्य आहार व परिपूर्ण आहाराचे महत्त्व
– मासिक पाळीच्या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या साधनांची योग्य विल्हेवाट कशी लावावी.
– किशोरवयीन मुली व स्त्रिया यांना शास्त्रीय माहिती व जाणीवजागृती

इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सध्या कोरोना काळात मासिक पाळी काळात लसीकरण करणेबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत , त्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शनानंतर उपस्थित महिलांनी डॉ. प्रतिभा जायभाय यांनी प्रश्न विचारले , मार्गदर्शकांनी प्रश्नोत्तरे स्वरूपात उपस्थिती त्यांच्या शंकांचे समाधान केले.

कार्यक्रमाला २५ जिल्ह्यातील एकूण १५० पेक्षा अधिक जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक,आशाताई, अंगणवाडी सेविका, CRP, बचत गट महिला  यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संचालन विद्या पाल यांनी तर आभार सुप्रिया पालवे यांनी मांडले.

#MHDay2021 #ItsTimeForAction #MahaArogya #IECBureau

Event Details